पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे काही निश्चित विधी नसल्यामुळे वादग्रस्त प्रसगं ी लग्नाची कायदेशीरता सिद्ध करणे कठीण होई. ती अडचण या कायद्याने नष्ट के ली.
 बडोद्याच्या या कायद्यात १९२८ मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली ती भारतातील सामाजिक कायद्यांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरावी. कारण या सुधारणेनुसार लग्नविधीच्या वेळी जे वैदिक मंत्र म्हटले जातात त्यांचा अर्थ पुरोहिताने वधू वरांना त्यांच्या मातृभाषेत सांगणे बंधनकारक के ले. तसे न के ल्यास त्याला ५०रु. दडं करण्याची तरतूद के ली. अशा प्रकारची तरतूद असणारा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतात आजअखेर एकही कायदा अस्तित्वात आला नाही. हा कायदा म्हणजे सामाजिक सध ारणांसाठीच्या कायद्याच्या इतिहासातील एक क्रांतिकारक टप्पा आहे.
 हिंदू परंपरेनुसार वधूच्या पित्याचे गोत्र व प्रवर हे पतीच्या गोत्र प्रवराहून भिन्न असणे गरजेचे होते. १९३२ मध्ये या कायद्यात के लेल्या सुधारणेनुसार हे निर्बंध काढून सगोत्र विवाहास कायदेशीर मान्यता देण्यात आली. १४ वर्षानंतर १९४६ मध्ये ब्रिटिश भारतात लागू करण्यात आलेल्या ‘Hindu Marriage Disabilities Removal Act’ मध्ये समान गोत्र व प्रवराच्या

व्यक्तींच्या विवाहाला परवानगी देण्यात आली.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /१७