पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या सदं र्भात रियासतकार सरदेसाई लिहितात, “भारताच्या सामाजिक व वैचारिक जीवनाच्या सध ारणेंत सयाजीरावांचा भाग के वढा मोठा आहे याची आता बाहेर फारशी कोणास कल्पना नाही. हळूहळू पन्नास-साठ वर्षें ही सध ारणा के वळ सयाजीरावांच्या पुरस्काराने सर्व देशांत न समजता घडून येत होती. विधवा-विवाह, वधूवरांचे योग्य वय, स्पृश्यास्पृश्य, जातिभेदाचें निर्मूलन इत्यादी विषयांचे कायदे व आचार प्रत्यक्षात आणणारे पहिले सत्ताधीश सयाजीराव होत.” रियासतकारांनी नोंदवलेले हे मत भारतीय सामाजिक सध ारणांच्या इतिहासातील सयाजीरावांचे ‘अनन्य’ स्थान स्पष्ट करते.
 दहा खंडात एकूण ६,५०० पृष्ठांचा ‘हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास’ लिहिणारे भारतरत्न डॉ.पी.व्ही. काणे हिंदू धर्माच्या मर्यादा सांगताना म्हणतात, “बहुतेक हिंदूनं ा एकत्र करतील अशा फक्त काही थोड्या बाबी आहेत. त्या म्हणजे कर्म आणि पुनर्जंन्माचा सिद्धांत, विस्तृत आणि मानास्पद असे ससं ्कृत वाङ्मय, वेदांबद्दल पूज्यता, मानससरोवरापासनू रामेश्वरापर्यंतची तीर्थक्षेत्रे या होत. परंतु सर्व हिदूमं ध्ये परिणामकारक ऐक्य उत्पत्न होण्यास या थोड्या गोष्टी, पुरेशा नव्हत्या. आमच्यातील पुष्कळ लोक योग्यता नसनू ही अध्यात्मवादी बनले, आचारांत आणि विचारांत फार मोठे अंतर पडले असनू परधर्मात गेलेल्यांना परत घेण्यात आले नाही, अस्पृश्यता मानण्यात येत असे इत्यादी

दोष आमच्या समाजात होते आणि आहेत.” या भाषणात

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /१८