पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९२७ मध्ये या कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार इतर सामान्य कायद्यांचे निर्बंध पाळून कोणताही सजातीय मुलगा दत्तक घेण्यास परवानगी देण्यात आली. पुढे १९२९ मध्ये बॅ.जयकर यांनी अशाच स्वरूपाची सध ारणा ब्रिटिश भारतातील कायद्यात सच वणारे बिल मुंबई कायदे मंडळात आणले. परंतु ते मंजूर झाले नाही. महाराज समाज सध ारणेसाठी फक्त कायदे करत नव्हते तर सबं ंधित विषयातील मूळ धर्मग्रंथांचे अनुवाद करून लोकांची धर्म साक्षरताही वाढवत होते. दत्तक विधीबाबत माहिती देणारा ‘दत्तकचंद्रिका’ या ग्रंथाचा सरु तकर यांनी के लेला मराठी अनुवाद महाराजांनी प्रसिद्ध के ला होता.

हिंदू घटस्फोट कायदा - १९३१
 ब्रिटिश भारतात घटस्फोट कायदा १८६९ मध्ये लागू झाला. तो कायदा ख्रिश्चन धर्मीयांसाठी होता. १९३१ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात लागू के लेला हिंदू घटस्फोट कायदा हा हिंदू कोड बिलाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा होता. कोर्टात नोंदणी के ल्याशिवाय घटस्फोट मान्य के ला जाणार नाही अशी या कायद्यात तरतूद होती. या कायद्यानुसार कोणत्याही स्त्रीच्या पतीचा मृत्यू होऊन ७ वर्षे झाली असतील, त्याने सनं ्यास घेतला असेल, त्याने धर्मांतर के लेले असेल किंवा तो नपुंसक असेल तर

त्या स्त्रीला अशा लग्नातून घटस्फोट मागण्याचा अधिकार या

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /२०