पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कायद्याने दिला. तसेच जर पती पत्नीला अमानुष वागणूक देत असेल, तो व्यसनात मग्न असेल व त्याला वाईट कर्म करण्याची सवय असेल तरीही स्त्रीला घटस्फोट मागण्याचा अधिकार होता. याबरोबर जर पत्नी लग्नाच्या वेळी इतर पुरुषाकडून गरोदर असल्याचे लग्नानंतर पतीला आढळून आल्यास किंवा पत्नीने दुसरा पती के ला असेल, तर त्या पुरुषाला आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोट मागण्याचा अधिकार होता. अशा प्रकारच्या घटस्फोट मागणीशिवाय वरील कारणापेक्षा कमी महत्त्वाच्या कारणांमुळे झालेला विवाह कायम ठे वून पती पत्नीला वेगवेगळे राहण्याची व्यवस्था व लग्नाच्या हक्कांच्या अधिकाराची व्यवस्थाही या कायद्यान्वये करण्यात आली होती. या मुख्य कलमांबरोबरच पत्नीच्या व तिच्या मुलाच्या उदरनिर्वाह आणि सगं ोपनाची व्यवस्था करण्याबद्दलचे नियमही या कायद्यात करण्यात आले होते.
 सयाजीरावांनी के लेल्या कायद्यांचा इतिहास तपासला असता अनेक वर्षांचे चिंतन मंथन झाल्यानंतरच सवंदनशील विषयावरील कायदे करण्यात आले होते असे दिसते. त्यामुळेच बडोद्यातले कायदे आदर्श आणि परिणामकारक ठरले होते. तसेच या कायद्यांचे अनुकरण इतर संस्थाने आणि खुद्द ब्रिटिश सरकारनेही के ले होते. म्हणूनच प्र.के .अत्रे म्हणतात,“सामाजिक क्षेत्रात महाराजांनी सर्वांत जी क्रांतिकारक सुधारणा के ली, ती

म्हणजे घटस्फोटाच्या कायद्याची. ब्रिटिश हिंदुस्थानात त्या वेळी

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल /२०