पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या कायद्याची वार्ताही नव्हती. पण महाराजांनी पुढाकार घेऊन हा कायदा पास के ला. त्याचा फायदा बडोदे ससं ्थानातल्या लोकांपेक्षा बाहेरच्याच लोकांनी बडोद्यात जाऊन घेतला.” यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.

हिंदू स्त्रियांचा सपं त्तीतील हक्क कायदा – १९३३
 १९३३ मध्ये हिंदू स्त्रीला सपं त्तीतील हक्क हा हिंदू कोड बिलातील शेवटचा सहावा कायदा करून सयाजीरावांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील हिंदू कोड बिलाची ‘दिशा’ निश्चित के ली. वारसा हक्काने हिंदू महिलांना सपं त्तीत हिस्सा देणारे बडोदा हे देशातील पहिले ससं ्थान आहे.  १९३३ च्या या कायद्यात पुढील तरतुदी करण्यात आल्या होत्या.
 १) सयंक्त कुटुंबात नवरा जर कुटुंबप्रमुख असेल तर त्याच्या मृत्यूनंतर ती स्त्री कुटुंबाच्या सपं त्तीत सहहिस्सेदार बनते, वंशपरंपरेने किंवा वाटणीद्वारे मिळणाऱ्या सपं त्तीची ती मालकीण आहे. २) तिच्या पतीने स्वतंत्रपणे निर्माण के लेल्या सपं त्तीची ती वारसदार आहे व तिच्या मुलांबरोबर त्या सपं त्तीत तिचाही वाटा आहे.
 ३) विधवेला तिच्या सपं त्तीचा शिक्षणासाठी व धर्मादाय कारणासाठी उपयोग करण्याचा अधिकार आहे.

४) अविवाहित मुलींना वडिलोपार्जित सपं त्तीत त्यांच्या

भावांबरोबरच हक्क आहे.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / २२