पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ब्रिटिश भारतात ‘द हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपटी अॅक्ट’ हा कायदा १९३७ मध्ये म्हणजेच बडोद्यानंतर ४ वर्षांनी पास झाला. स्वतंत्र भारतात १९५६ मध्ये ‘Hindu Succession Act’ पास करण्यात आला. या कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक अभ्यास के ला असता १९३३ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात लागू के लेला हा कायदा अधिक प्रगत होता हे मान्य करावे लागते.
 १८ मार्च १९६३ रोजी दैनिक मराठामध्ये महाराजांच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या अग्रलेखात प्र.के . अत्रे यांनी एकूणच सयाजीरावांच्या कर्तृत्वाचा नेमके पणाने वेध घेतला आहे. या लेखातील हिंदू कोड बिलासदं र्भातील त्यांचे भाष्य या कायद्याच्या निमित्ताने विचारात घेणे आवश्यक आहे. अत्रे म्हणतात, “१९०५ साली महाराजांनी ‘हिंदू कायदा’ कोडाच्या स्वरूपात प्रसिद्ध करून जे ब्रिटिशांना हिंदुस्थानात शक्य झाले नाही, एवढेच नव्हे तर आता काँग्रेसच्या राज्यात कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांनाही करता आले नाही, ते त्यांनी करून दाखवले.” अत्रेंचे हे विश्ले षण महाराष्ट्राने वेळीच गंभीरपणे घेतले असते तर शिवाजी महाराजांच्या नंतरचा महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचला असता.
 आपला एकारलेला आणि व्यक्तिकें द्री इतिहास आपण वेळीच दुरुस्त के ला नाही तर तो इतिहास अधिक विखारी होतो. असा इतिहास पुढील अनेक पिढ्यांना अधोगतीकडे नेणारा ठरतो हे

आजवरच्या अनुभवातून शिकण्याची वेळ आता आली आहे.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / २५