पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
हिंदू कोड बिल



 धर्म, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात सधरणांचा ‘पर्वत’ उभा करणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत सामान्य शेतकरी कुटुंबात जीवन व्यतीत के लेल्या निरक्षर सयाजीरावांनी आयुष्यभर इतिहास, धर्म, समाजशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान यासारख्या ज्ञानशाखांचा एक ‘आदर्श’ विद्यार्थी म्हणून के लेला व्यासगं त्यांच्या प्रशासकीय वाटचालीत महत्त्वपूर्ण ठरला. या व्यासगं ाबरोबरच १८८७ च्या पहिल्या परदेश प्रवासापासनू सयाजीरावांनी जाणीवपूर्वक जोपासलेल्या तुलनात्मक धर्मविचारामुळेच सयाजीराव महाराज धर्म ही सकल्पना अतिशय पद्धतशीरपणे समजून घेऊ शकले. जगभरातील धर्म सकल्पनांमध्ये टोकाचे अंतर्विरोध दिसत असले तरी सर्व धर्मांचे मूलतत्त्व अंतिमत: मानव कल्याण हेच आहे ही त्यांची दृष्टी जगातील सर्व धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासातून सयाजीरावांनी कमावली होती.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / ६