पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विशेष बाब म्हणजे भारतात हिंदू कोड बिलासाठीची ही प्राथमिक समिती स्थापन होण्याआधी ८ वर्षे १९३३ मध्ये सयाजीरावांनी हिंदू कोड बिलातील शेवटचा सहावा कायदा बडोद्यात अमलात आणला होता. यातून एक बाब स्पष्ट होते की अस्पृश्यांबरोबरच स्त्रियांना त्यांचे सर्व अधिकार कोणतीही मागणी करण्याअगोदर सन्मानाने व कायदे करून सयाजीरावांनी दिले. यातून ‘भारतातील सर्वात मोठे समाजक्रांतिकारक महाराजा सयाजीराव होते’ हा सिद्धांत स्पष्टपणे सिद्ध होतो.
 बी.एन.राव समितीने हिंदू वारसा आणि हिंदू विवाह कायद्याचा मसदु ा तयार के ला. ब्रिटिश कें द्रीय कायदेमंडळांच्या दोन्ही सभागृहांनी राव समितीची पुनर्रचना करून या समितीकडे सर्व हिंदू कायद्यांचा मसदु ा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. १९४४ च्या सरुु वातीला या नवीन समितीचे गठन करण्यात आले. पुढच्या सपं ूर्ण वर्षात या समितीने भारतभर दौरा करून राव समितीने तयार के लेल्या हिंदू वारसा व हिंदू विवाह कायदे आणि सर्व हिंदू कायद्यांच्या गठनाबाबत जनतेचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न के ला. या दौऱ्यादरम्यान देशभरातील विविध प्रख्यात वकील आणि प्रतिनिधी सघं टनांची मते आणि पुरावे या समितीने गोळा के ले.
 या दौऱ्यातून हाती आलेल्या माहितीच्या आधारे हिंदू कोड बिलाचा मसदु ा तयार करण्यात आला. अखेर १ ऑगस्ट १९४६

रोजी ब्रिटिश कें द्रीय कायदेमंडळात हा मसदु ा मांडण्यात आला.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / ९