पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथाद्वारे धर्मसाक्षरतेतून प्रबोधनाचे महाअभियान सुरू केले होते हे सिद्ध होते. महत्त्वाचे म्हणजे Annihilation of Caste ची पूर्वतयारी ठरणारा 'The Depressed Classes' हा इंग्रजी निबंध महाराजांनी १९०९ मध्ये लिहिला होता. या निबंधात अस्पृश्यता हा राष्ट्रीय प्रश्न आहे ही ऐतिहासिक मांडणी महाराजांनी भारतात सर्वप्रथम केली होती. या निबंधात 'अस्पृश्यतायुक्त भारत म्हणजे राष्ट्रीय आत्महत्या आहे' हा सिद्धांत महाराजांनी मांडला. महत्त्वाचे म्हणजे अस्पृश्यता ही धर्माची उत्पत्ती असल्याची स्पष्ट मांडणी या निबंधात महाराजांनी केली.
 Annihilation of Caste मध्ये बाबासाहेबांनी जी मांडणी केली होती त्याची तुलना महाराजांच्या या निबंधाशी केली असता बाबासाहेबांअगोदर २७ वर्षे सयाजीरावांनी जी मांडणी केली होती त्या मांडणीशी सुसंगत बाबासाहेबांनी पुढचा प्रवास केला असल्याचे दिसते. Annihilation of Caste या प्रबंधाची मांडणी करत असताना बाबासाहेबांनी सयाजीरावांचा हा निबंध वाचला होता का याबद्दल कोणतेही संदर्भ सापडत नाहीत. म्हणूनच या दोन्ही निबंधांमधील साम्य हा सुखद योगायोग आहे.

 १९०४ मध्ये केलेल्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याची तयारी महाराज १८८६ पासून म्हणजेच १८ वर्षे अगोदर, १९०६ मध्ये 'लागू केलेल्या सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याची तयारी १८८२ पासून म्हणजेच २४ वर्षे अगोदर, १९१५ च्या पुरोहित कायद्याची तयारी १८८६ पासून म्हणजेच २९ वर्षे

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १३