पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिंदू पुरोहित कायद्यातील तरतुदी
 ३० डिसेंबर १९१५ रोजी बडोदा जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या हिंदू पुरोहित कायद्यात पुढील प्रमुख तरतुदी करण्यात आल्या होत्या.
 १) बडोदा सरकारकडून घेण्यात येणाऱ्या हिंदू पुरोहित परीक्षा, याज्ञिक विषयातील किंवा श्रावणमास दक्षिणा परीक्षा यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या पुरोहिताला पौरोहित्यासाठीचा परवाना देण्यात येईल.
 २) या कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्या सरकारी परवानाप्राप्त पुरोहितावर बडोदा सरकारने नियुक्त केलेल्या न्यायालयात खटला चालवण्यात येईल.
 ३) एखाद्या जातीत सरकारी परवानाप्राप्त पुरोहित उपलब्ध नसल्यास त्या जातीतील पारंपरिक पुरोहितास धार्मिक विधी करता येतील.
 ४) बडोदा सरकारने निश्चित केलेल्या अंत्यविधी व इतर काही विशेष धर्मविधींना या कायद्यातील तरतुदींमधून वगळण्यात आले आहे.
 ५) बडोदा सरकारने काही विशेष कारणास्तव सूट दिलेल्या व्यक्तीला पुरोहित परीक्षेचा नियम लागू नसेल.

 पुरोहित कायद्यातील तरतुदीनुसार हिंदू धर्मातील कोणत्याही जातीतील व्यक्तींना पौरोहित्यासाठीची परीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झाला. या तरतुदीमुळे धार्मिक विधी करण्याबाबतची

महाराजा सयाजीराव आणि हिंदू पुरोहित कायदा / १८