पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बडोद्यात पहिल्यांदाच सिव्हिल सर्जन्सची परिषद भरविण्यात आली.
 १८९१-९२ साली स्वच्छता विभागाची ( sanitary department) निर्मिती केली. त्यावर डॉ. कृष्णराव धुरंधर यांची स्वच्छता अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वच्छता अधीक्षक दरवर्षी बडोदा संस्थानातील विविध ठिकाणची पाहणी करून स्वच्छतेसंबंधी सुधारणा करणाऱ्या सूचना व 'स्वच्छता' या विषयावर विविध व्याख्याने देत असत. १९०७ साली 'स्वच्छता' व 'स्वच्छतेची तत्त्वे' या दोन पुस्तिका तयार करून लोकांमध्ये वाटण्यात आल्या. १९०९ साली मुंबई येथे भरलेल्या वैद्यकीय महासभेत सहभागी होण्यासाठी स्वच्छता अधीक्षकाला पाठविण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्राला मदत

 इतर विषयांच्या बरोबरीने वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही सयाजीरावांनी शिक्षणासाठी विविध ठिकाणी पाठविले. १८८७-८८ मध्ये कॅमा हॉस्पिटलला दोन विद्यार्थिनींना परिचारिका व सुईनीचे शिक्षण घेण्यासाठी पाठविले. १८८८ मध्ये शासकीय खर्चाने चार पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. १९१३ मध्ये एका वैद्यकीय पदविधारकाला M.D. डिग्रीचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला पाठविले. भारतीय भाषेतील बहुधा पहिल्या

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ११