पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागू करण्यात आलेल्या 'बॉम्बे माता कल्याण कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करण्यात आला होता. कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या प्रसूतीच्या काही काळ आधी व काही काळ नंतर कारखान्यातील त्यांच्या रोजगाराच्या नियमनाची आणि प्रसूतीदरम्यान त्यांना आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली. तसेच राज्यातील प्रशिक्षित स्त्रीरोगतज्ञांना रोजगार देण्यासाठी बडोदा सरकारने नियम केला. त्यानुसार स्त्रीरोग तज्ञांचा अर्धा खर्च सरकार व अर्धा खर्च स्थानिक संस्थांनी देण्याची तरतूद केली.
बालकांचे आरोग्य

 बालकांच्या आरोग्याकडेही बडोद्यात विशेष लक्ष दिले जात होते. शाळकरी मुलांच्या नियमित वैद्यकीय तपासणी केल्या जात होत्या. गरीब विद्यार्थ्यांना दूध, औषधे व आवश्यक असल्यास चष्मा पुरवण्याची व्यवस्था सयाजीरावांनी केली होती. तसेच बडोदा शहरात विविध ठिकाणी मातृत्व व बालकल्याण यासंबंधी Magic Lantern (चित्रफित प्रक्षेपण यंत्र) च्या मदतीने ४० व्याख्याने दिली होती. बालकांना वयाच्या आठव्या वर्षी पूर्ण लसीकरण सक्तीचे केले. प्राथमिक लसीकरणाचे वय कमी करून बारा वरून सहा महिने केले. ही तरतूद विशेषतः बडोदा शहरासाठी केली होती. १९१० मध्ये सयाजीरावांनी संस्थानातील मुलामुलींमधील जीवनसत्वांचे प्रमाण जाणून घेऊन त्यांच्यातील दुर्बलता कमी करण्यासाठी सत्त्वविचारक समिती

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १६