पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



शिष्यवृत्ती महाराजांनी सुरू केली. अशा प्रकारची शिष्यवृत्ती सुरू करणारे बडोदा हे भारतातील पहिले संस्थान होते. अगदी स्वातंत्र्यानंतरही खास शारीरिक शिक्षणासाठी हायस्कूल स्तरावर शिष्यवृत्तीची योजना केंद्र सरकारबरोबर कोणत्याही राज्य सरकारने राबवल्याचे उदाहरण आढळत नाही. १८९५-९६ मध्ये प्रथमच जनतेच्या वर्गणीतून मर्दानी खेळांचे सार्वजनिक प्रदर्शन भरवण्यात आले. महाराजांनी या प्रदर्शनासाठी शंभर रुपये देणगी दिली. शारीरिक प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराजांनी या प्रदर्शनामध्ये काही बक्षिसे मंजूर केली होती.

 १८९८ ला बडोद्यातील शाळांमध्ये चौथीच्या विद्यार्थांना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. १९९१-९२ मध्ये सरकारच्या वतीने संस्थानातील सर्व प्राथमिक शाळा, पहिल्या श्रेणीच्या अँग्लो व्हर्नक्युलर शाळा आणि हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करून आवश्यक क्रीडा साहित्य पुरवण्यात आले. नियुक्त केलेल्या या शिक्षकांकडून मल्लखांब, जोडी कुस्ती, कवायत, लांब उडी, उंच उडी, घोडसवारी, सिंगलबार, डबलबार, डंबेल्स इ. क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना शिकविले जात. १९३८-३९ मध्ये बडोदा शहर आणि बडोदा महाल क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. संस्थानातील सर्व शाळांमध्ये शारीरिक शिक्षण सक्तीचे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात शारीरिक शिक्षक तयार करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / १९