पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन अनेक राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले. आशियाई स्पर्धेत भाग घेणारी ती बडोद्याची व गुजरातची पहिली महिला ठरली.
 सयाजीरावांच्या पश्चात बडोद्यातील 'थोरातांचा आखाडा' या नामांकित व्यायाम शाळेने शंकरराव थोरातांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी गायकवाड, शाहू गायकवाड यांच्यासारखे नामवंत कुस्तीगीर तयार केले. सलाटवाडा व्यायामशाळेने वसंत सुर्वे, कल्याण घाग, लक्ष्मण वाडकर यासारखे सुप्रसिद्ध खेळाडू तयार केले. या क्रीडा क्षेत्रात जेतलपूर येथील मुस्लिम व्यायामशाळेने मम्रज खान पठाण व मुन्वर खान पठाण यासारखे मुंबई राज्य क्रीडा स्पर्धेत ब्राँझपदक मिळवणारे क्रीडापटू दिले.
 टेबल टेनिस हा विदेशी खेळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळूहळू बडोद्यात रुजला. भारतात सिंगल्सप्रमाणे डबल्समधील सामन्यांमध्ये या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कलिका जयवंत, ललिता गायकवाड, राणी काळे, रोशन झेनोबिया सेठना, मीना दामले या महिला विभागात अग्रेसर होत्या. त्यानंतर प्रसाद विप्रदासने जागतिक स्पर्धेत पंचांचे यशस्वी काम करून बडोद्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व जागतिक स्पर्धेत गाजविले.
आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रास मदत

 सयाजीरावांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी भरभरून खर्च केला. १८९२ ला मुंबई येथील महारोगी आश्रमास १०,००० रु. मदत दिली. बडोद्यात स्त्रियांच्या

महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / २९