पान:महाराजा सयाजीराव - आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दक्ष कुटुंबाच्या भूमिकेतून केलेली उपाययोजना होती. मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही एकाच वेळी हाताळण्याच्या बाबी आहेत याचे भानही महाराजांनी जोपासले होते.<BVR>  वाचन हे मानसिक आरोग्यासाठीचे सर्वात मोठे औषध मानून महाराजांनी ग्रंथालय चळवळ अगदी स्मशानभूमी, पोलिस स्टेशन, जेल आणि दवाखान्यापर्यंत नेली. उपचारापेक्षा आरोग्यदायी सामाजिक पर्यावरणाच्या निर्मितीवर महाराजांनी सातत्याने काम केले. म्हणूनच आरोग्य हा विषय हातळणाऱ्या महाराजांच्या समकालीन आणि त्यानंतर आजअखेरच्या सर्व प्रशासकांशी महाराजांची तुलना केली असता इतर क्षेत्राप्रमाणे आरोग्यविषयक क्षेत्रातसुद्धा 'मानदंड' निर्माण करणारे काम करणारे सयाजीराव हे 'एकमेवाद्वितीय' प्रशासक ठरतात. आज ज्याप्रमाणे 'world happiness index' दरवर्षी प्रकाशित केला जातो, तसा त्या काळात प्रकाशित केला जात असता तर बडोदा हे जगातील ५ आनंदी देशांच्या यादीत अग्रक्रमाने राहिले असते इतके नक्की!

●●●
महाराजा सयाजीराव : आरोग्य आणि व्यायामविषयक कार्य / ३१