पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंपरेने टाळले. यातूनच प्रबोधन परंपरेचे आजचे 'अनर्थ' घडले. या मालेत पुढे १९०३ मध्ये 'वधूपरीक्षा', १९०४ मध्ये 'लग्नविधी व सोहळे, १९९३ मध्ये 'विवाह विधीसार', १९९६ मध्ये ‘उपनयन विधीसार” पुढे 'श्राद्ध- विधीसार', 'अंत्येष्टीविधिसार', 'दत्तकचंद्रिका', 'दानचंद्रिका' इ. ग्रंथ प्रकाशित करून फुल्यांनी सुरू केलेल्या धर्मचिकित्सेला सयाजीरावांनी सकारात्मक धर्म साक्षरता अभियानात रुपांतरित केले.
 १८९६ च्या वेदोक्तानंतर सयाजीरावांनी सर्व वेदोक्त विधींच्या संदर्भातील १६ संस्कारांच्या विधींचे मराठी भाषांतर करून छापण्याचे काम रियासतकार सरदेसाईंकडून करून घेतले होते. इतकेच नाही तर १९०५ च्या हिंदू विवाह कायद्यात १९२८ साली सुधारणा करून लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराथी व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात यावे व ते भाषांतर वधू-वरांच्या मातृभाषेत लग्न लावणाऱ्या पुरोहिताने वाचून समजावून सांगावे व तसे न केल्यास त्याला ५०रु. दंड करण्याची तरतूद केली. ही दंडाची रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात १ लाख ३० हजार रु. हून अधिक भरते.
आंबेडकरांकडून अनुकरण

 १९१५ मध्ये बडोद्यात लागू झालेला हिंदू पुरोहित कायदा फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील अशा प्रकारचा पहिला आणि आजअखेरचा एकमेव कायदा आहे. या कायद्यातील कलमे, या

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / १६