पान:महाराजा सयाजीराव - कृतीशील सत्यशोधक.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तत्त्वज्ञान आम्ही अक्षरओळख आणि नकारात्मक धर्मटीका या चौकटीत बंदिस्त केले. याउलट फुले ज्यांना गुरुस्थानी मानत होते ते फुल्यांचे सृजनशील अनुयायी सयाजीराव मात्र फुल्यांना अपेक्षित असणारा ‘अज्ञान निर्मूलनाचा कृतिकार्यक्रम' मानवी जीवनाचे एकही अंग न सोडता शांतपणे, कोणताही डांगोरा न पिटता, स्टंटबाजी न करता आपल्या बडोदा संस्थानाबरोबर महाराष्ट्रभर राबवत होते.
 विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे फुल्यांचे अनुयायी असणे म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणे आणि त्यांचा द्वेष करणे या संकुचित सुत्रापलीकडे जाऊन, प्रसंगी फुल्यांपेक्षाही परखड भाषेत परंतु ब्राह्मणद्वेष विरहित दृष्टिकोनातून ब्राह्मणांचा समाचार घेणाऱ्या सयाजीरावांना महाराष्ट्र कृतघ्नपणे विसरला यातच आपल्या पुरोगामी चळवळीच्या 'जातीयकरणा'ची बीजे लपली आहेत. म्हणूनच कॉ. शरद पाटील ज्याला 'आत्मटीका' म्हणतात तो जीवघेणा मार्ग स्वीकारून आजच्या फुले जयंतीच्या निमित्ताने जोतीबा आणि सयाजीराव हा 'क्रांतीसेतू' समजून घेणे म्हणजे विषमतेचा प्रवाह ओलांडण्याचा 'नवा विचारपूल' तयार करणे होईल.
हिम्मतबाज सयाजीराव

 १८८३ मध्ये लिहिलेल्या 'शेतकऱ्यांचा असूड' या ग्रंथाच्या आरंभी फुल्यांनी वरील ओळी लिहिल्या होत्या. हा ग्रंथ प्रकाशित होण्याअगोदर दोन वर्षे १८८१ मध्ये सयाजीरावांना राज्याधिकार

महाराजा सयाजीराव : कृतीशील सत्यशोधक / ७