पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपल्या बैठकीच्या खोलीत सयाजीरावांचा फोटो लावून महाराजांना सलाम का केला होता याचे उत्तर मिळते. फुल्यांनी सयाजीरावांचा फोटो जेव्हा आपल्या बैठकीच्या खोलीत लावला तेव्हा 'सयाजीयुगा'चा नुकताच आरंभ झाला होता. फुले आणखी १०-२० वर्षे जगले असते तर आनंदाने बेभान होऊन त्यांनी महाराजांना 'वैचारिक मुजरा' घातला असता. यावरून ‘सयाजीराव हे ‘आधुनिक' भारताचे आणि 'पुरोगामी' महाराष्ट्राचे सूत्रधार होते' हा सिद्धांत प्रस्थापित होतो.

●●●
महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / २६