पान:महाराजा सयाजीराव - स्त्रीविषयक कार्य.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
स्त्रीविषयक कार्य


 भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा फुले यांना आपण भारतीय स्त्री मुक्तीचे अग्रदूत मानतो. त्यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली. फुले हे मुलींची शाळा सुरू करणारे पहिले भारतीय असल्याचे विचारात घेऊन त्यांना स्त्री मुक्तीचे अग्रदूत म्हटले जाते. त्याचप्रमाणे जात आणि स्त्री-दास्य यांची सांगड घालणारे आधुनिक भारतातील पहिले तत्त्वज्ञ म्हणूनदेखील अग्रपूजेचा मान फुलेंना जातो. परंतु आधुनिक भारताबरोबरच पुरोगामी महाराष्ट्र या क्षेत्रातील सयाजीरावांच्या क्रांती कार्याबाबत पूर्णत: अंधारात आहे.

 स्वातंत्र्यानंतरच्या काळात १९७० नंतर भारतात गतिमान झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीने सयाजीरावांच्या कार्यातून प्रेरणा आणि त्यांचा स्त्रीमुक्तीचा कृतीकार्यक्रम तयार करण्यासाठी खात्रीशीरपणे उपयुक्त ठरणारे संदर्भ वेळीच स्वीकारले असते तर आजची एकारलेली आणि पराभूत अवस्था तिला टाळता आली असती. यासाठी बडोद्यातील कायदे असोत, शिक्षण

महाराजा सयाजीराव : स्त्रीविषयक कार्य / ६