पान:महाराज्ञी व्हिक्टोरिआ ह्यांचें चरित्र.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
प्रस्तावना.

      दयाळू, भाग्यशालिनी, अशा महाराज्ञी व्हिक्टोरिआ        ह्यांची असंख्यात चरित्रे मोठमोठ्या विख्यात आं-         ग्लदेशस्थ ग्रंथकारांनीं लिहिलेली असतां सांपत्तिक        व मानसिक दृष्ट्या विचार केला असतां ज्याची          स्थिति असमाधानकारक ठरेल अशा मज सारख्यानें तेंच काम कां ह्मणून हातीं घेतले हा प्रश्न सदर पुस्तक हातीं घेतांच सकृतदर्शनीं उद्भवेल. ह्याचें उत्तर अगदीं साधें आहे. ह्या पुस्तकांत नमूद केले गेले ह्मणूनच महाराज्ञीच्या अंगीं असलेल्या गुणांस महत्व येऊन तिचें वैभव वाढेल असें बिलकुल ह्मणणें नाहीं. त्या गुणांचें महत्व मी नव्यानें गावयास पाहिजे असें नाहीं. पुस्तक लिहिण्याचें कारण आत्मगत आहे. महाराज्ञी चक्रवर्तिनी असून अखिल स्त्रीजातीस ललामभूत आहे असा ग्रह तिच्या उदार चरितांतील गोष्टींशीं परिचित अशा गृहस्थांचें मनामध्यें उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाहीं. सदर पुस्तक लेखन व प्रकाशन हा ह्याच ग्रहाचा परिणाम होय. आमच्या समजुतीप्रमाणें व- तशी समजूत असणें अयथार्थ नाहीं - राजा हा सर्वशक्तिमत् व विश्वचालक जो परमेश्वर त्याचा ह्या भूलोकचा प्रतिनिधि होय. ज्याप्रमाणें ह्या अखिल विश्वाचा चालक संपूर्ण वस्तुजाताशीं समदृष्टीनें दयाळू व न्यायी वर्तन ठेवितो त्याप्रमाणेंच ह्या भाग्यशाली राज्ञीचे लहाना पासून थोरापर्यंत दयाळू व न्यायी वर्तन आहे.