पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५)

म्हणजे इ० स० १७८० त पुत्ररत्न प्राप्त झाले व तेंच रत्न उत्तरोत्तर आमच्या देशाच्या इतिहासास प्रकाशीत करितें झाले. असो. तद्नंतर महानसिंगाने 'काटक' येथील राजा संसारचंद व रामगढ़िया मिसलीचा मुख्य 'जस्सासिंग ' या दोबांस विनंती करून आपल्या पक्षास सामील करून घेतलें. त्याचा असे करण्याचा हेतू इतकाच होता की, त्याच्या धुमसत असलेल्या क्रोधाग्नीस कन्हैया हमीरसिंगाचा पुत्र राजा 'जयसिंग' याच्या प्राणाची पूर्णाहुती द्यावयाची होती. हा जयसिंग फार शूर व लढाईच्या कामी वाकबगार असा होता. त्यामुळे त्याचा लढाईत पाडाव करणे महानूसिंगास फार कठीण होतें; तथापि त्यानें वरील दोघां राजांसह इ० स० १७८४ त ' वटाली' येथें जयसिंगाबरोबर लढाई दिली. तींत जयसिंगाचा दुर्दैवाने मोड होऊन अतिशय नुकसान झालें. शेवटीं त्या उभयपक्षांत तह. होऊन त्यांत असे ठरलें कीं, “काटक येथील राजापासून जयसिंगानें पूर्वी घेतलेली 'कांगरादरी' त्याची त्यास परत द्यावी व जस्सासिंग रामगढीयाचें जें कांहीं पूर्वी घेतलें असेल तेही त्यानें त्यास परत द्यावें; आणि सुकरचक्रिया व कन्हैय्या या दोन मसलींतील पूर्वापार चालत आलेला वैरभाव नाहींसा होण्याकरितां जयसिंगाने आपला मुलगा गुरुचक्षसिंग याची अल्पवयी कन्या 'महताब कुबर' महानसिंगाचा मुलगा 'रणजिसिंग यास द्यावी. " याप्रमाणें तहनामा झाल्यानंतर सदई दोन मिसलींत जो पूर्वीपासून बेबनाव होता त्यास कांहींसा आळा पडला.
 इतक्या महासिंग संतुष्ट झाला नाहीं. त्यास त्याचे आणखी दुसरे जे भांगी राजे व सरदार शत्रू होते, त्यांजत्र-