पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६ )

 रोवर झुंजावयाचे होते; म्हणून त्यानें बटाला येथील लढाई झाल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणें रणजितसिंगाचें इ० स० १७८६ त जयसिंगाच्या नातीबरोबर लग्न लावून देऊन आपण आपल्या उद्योगास लागला. इतक्या अल्पवयांत लग्न करण्याची रूढी शीख व रजपूत लोकांत पूर्वीपासून प्रचारांत होती व अद्यापिही कोठे कोठे आढळते; तरी पण असा प्रकार आतां हळूहळू कमी होण्याची पुष्कळ आशा आहे. असो. महानसिंगार्ने इ० स० १७९२ त भांगी राजांत अतिशय बलिष्ठ राजा 'साहेबसिंग' यास जिंकण्याची तयारी केली. हा साहेबसिंग महानसिंगाचा प्रत्यक्ष मेहुणा होता; तथापि क्षत्रिय ब्रीदास अनुसरून महानूसिंगानें आपण मरेप- र्यंत त्याची पाठ सोडिली नाहीं. त्याच्या मनांत साहेबसिंगाचें आवडते शहर में 'गुजरात' तें घेण्याचे फार होतें; परंतु साहेबसिंगानें ‘चुनियट' येथील भांगी सरदारास बरोबर घेऊन सोधान येथील किल्यांत महासिंग असतां त्यास वेढा दिला. असें झालें तरी महानसिंग न डगमगतां वेढा देणाऱ्यांच्या आंगावर धैयानें चालून आला; परंतु दैववशात् असें झालें कीं, तो ज्या हत्तीवर बसला होता त्या हत्तीवरून एकाएक घेरी आल्यामुळे तो खालीं पडला, तेव्हां त्याच्या एका चलाख हुजन्यानें त्यास तसेंच उचलून चोरवाटेने किल्याच्या बाहेर आणिलें. नंतर आपला धनी नाहींसा झाला असें पाहून महानसिंगाच्या सैन्यानें किल्ला शत्रूच्या स्वाधीन केला. इकडे महानसिंगास त्याच्या हुजऱ्यानें मूर्च्छितावस्थेत किल्या- बाहेर आणिल्यावर त्यास 'गुजरानवाला' येथें बंदोबस्तानें आणिलें; पुढे तीनच दिवसांनी त्याचा तेथें अंत झाला. यावेळी त्याचे वय अवघें २७ वर्षांचें होतें.