पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७ )

भाग २.

रणजितसिंग आपल्या जहागिरीचा कारभार पाहू लागतो त्याच्या सासूचा व त्याचा बेबनाव - त्याची आई राणी 'राजकुवर' - तिचा परम स्नेही ‘लखपतराय’-कैटल येथील स्वारी- लखपतरा- याचा मृत्यु-राजकुवरचें गुप्तपणे निघून जाणें-झेमान- शहावर स्वारी - लाहोर शहर कावीज करणें-झेमान- शहाचें कपट- त्याचा परिस्फोट - रणजितसिंगाचें दुसरे लग्न - त्याने आपणास 'राजा' म्हणवून घेणे-भांगी सरदार साहेबसिंग व गुलाबसिंग - त्यांचा गुप्तकट-चसन येथील दरवार - सदाकुवरचें कंपनी सरकारच्या आश्र यास जाऊन राहण्याचे कारस्थान - वगैरे.
महानसिंग अकाली मृत्यु पावला, म्हणून त्यावेळच्या त्याच्या दरबारी लोकांस अतिशय दुःख झालें. त्यांस सुकरचकिया मिसलीचा एक भक्कम खांब नाहींसा झाला असे वाटून आतां यापुढे या मिसलीचा कारभार कसा चालेल व शत्रूंच्या हातून आपला बचाव कसा होईल ही काळजी वाहूं लागली. गुजराणवाला येथील जहागिरीचा वारस म्हटला म्हणजे आतां आमच्या चरित्रनायकाशिवाय दुसरा कोणी नव्हता हे उघड आहे. परंतु तो अल्पवयी केवळ १२ वर्षांचें मूलच होतें ; यामुळे राज्यकारभारासारखे महत्वाचें व जोखमाचें काम त्याच्यानें कसें हांकवेल ही शंका सर्वत्र उत्पन्न झाली. याकरितां सर्व सरदार लोकांनीं रणजितसिंगाच्या सासूच्या म्हणजे 'सदाकुवर 'च्या मदतीनें तो राज्यशकट चालविण्याचा बेत केला. कारण रणजितसिंगास त्यावेळीं