पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( ९ )

आपली सासू व आई हे दोन कांटे आहेत ते कसे तरी काढून टाकून आपण स्वतंत्रपणे राज्यकारभार पहावा असें आलें. कारण सदाकुवरचें वजन त्यावेळीं राज्यकारभारांत व सरदार वगैरे लोकांवर वाजवीपेक्षां जास्त पडूं लागल्यामुळे तें दरबारी लोकांस अर्थात् सहन न होऊन त्यांनीं त्या संबंधाची बरीच वाटाघाट चालविलेली रणजितसिंगाच्या कानावर आली होती, व तसेंच त्यास आपल्या आईच्या पातित्रत्त्याविषयींही संशय आला होता. त्याच्या आईच्या ( राजकुवरच्या ) खानगीकडे कोणी 'लखपतराय ' नांवाचा मनुष्य होता, त्यावर तिची अत्यंत प्रीति जडली होती. लखपत्राय हा फार दुराचारी व कपटी मनुष्य होता. त्यानें रणजित्- सिंगाच्या हातीं राज्यसूत्रे आल्यावर तो आपल्यास जिवंत ठेवणार नाहीं असें पूर्वीच भाकीत करून ठेविलें होतें. रण- जितसिंगानें वरकरणी निमित्त करून "कैटल " येथील स्त्रारीवर जाण्याची लवकरच तयारी केली; परंतु आपण स्वतः त्या मोहिमेवर न जातां तें काम आपल्या एका सर- दारावर त्यानें सोंपविलें, आणि राणी राजकुवरपासून लख- पत्रायास स्वारीबरोबर जाण्याकरितां मागून घेतलें. राज- कुवरच्या मनांत आपला व आपल्या प्रीतिपात्राचा वियोग व्हावा असें नव्हतें ; तथापि रणजितसिंगानें फारच आग्रह धरिल्यामुळे तिला त्याचा शब्द बाह्यात्कारें तरी मोडवेना. राजकुवरचा लखपत्रायास मोहिमेवर नेण्याबद्दल रुकार मिळा- ल्यामुळे रणजितसिंगास अत्यानंद झाला व त्यास असें वाटलें की, आपला शत्रू आतां पुन्हां परत येण्याची आशा नको : कारण लखपत्राय लढाईच्या कामी अगदीं निरुपयोगी मनुष्य होता हैं त्यास पूर्णपणे माहीत होतें. असो. लखपत्