पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )

रायास राजकुवरपासून दूर करण्याची जी ही शक्कल रणजितसिंगार्ने काढिली तिचा शेवट कैवल येथील लढाईतच त्याच्या मरणांत झाला; परंतु ह्या गोष्टीचें खापर रणजित्- सिंगाच्याच कपाळीं फुटलें. ह्याचें कारण, रणजितसिंगार्ने बुद्ध्या स्वारीचे निमित्त करून लखपत्रायास मारेकऱ्यांकडून ठार मारविलें असें राणी राजकुवरनें प्रसिद्ध केलें. नंतर कांहीं दिवसांनी राणी राजकुवरही गुजराणवाला येथून गुप्त रीतीनें कोणीकडे निघून गेली तिचा पुढें थांग किंवा पत्ता सुद्धां कोणास उमगला नाहीं. त्यावरून तत्पक्षियांनी तिलाही खुद्द रणजितसिंगानें मारिलें असावें असा त्यावर आरोप आणिला; परंतु ह्या दोन्ही गोष्टींत मुळींच तथ्य नाहीं असें म्हणावें लागतें; कारण या संबंधानें 'सर लिपेल ग्रिफिन' नामक एक इंग्रज ग्रंथकार असें म्हणतो कीं, "वरील दोन्ही अपवादांस मुळींच आधार नाहीं, कारण रणजितसिंगाच्या स्वमात्राविषयीं जें काय मला खात्रीपूर्वक समजलें आहे त्यावरून तो इतका साहसी व अविचारी असावा असे मला बिलकूल वाटत नाहीं. "
वर सांगितल्याप्रमार्णे रणजितसिंगार्ने, स्वतः अथवा पर्यायानें कां होईना, आपली दुराचारी आई राणी राजकुवर व तिचें प्रेमपात्र लखपत्राय या उभयतांची कायमची व्यवस्था लाविल्यावर त्यास आपल्या सासूचेंही पारिपत्य करावयाचें होतें; परंतु तें काम त्यानें कांहीं दिवस- पावेतों तसेंच लांबणीवर टाकिलें. ह्याचें कारण त्यावेळीं दर- बारांत तिर्चे प्राबल्य जास्त वाढल्या कारणानें दरबारचे लोक आपल्यास या प्रसंग अनुकूल होतील किंवा नाहीं ह्याविषयीं त्यास शंका होती. ह्याकरितां तो बेत रहित करून त्यानें