पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
( ११ )

एका नव्या स्वारीवर जाण्याची जंगी तयारी चालविली. ही मोहीम लाहोर येथील अफगाण सरदारावर होती. हा अफगाण सरदार कोण वगैरे जाणण्याची आमच्या वाचकांस जिज्ञासा असर्णे साहजिक आहे व ती पूर्ण करणें आमचें कर्त्तव्य आहे; म्हणून आम्ही तत्संबंधानें ह्याखाली त्याचें थोडेंसें दिग्दर्शन करितों.
 इतिहासप्रसिद्ध अहमदशहा अबदलीचा नातू "झेमान- शहा " इ. स. १७८३ त काबूल येथें गादीवर बसला. त्याने इ. स. १७९५ त पहिल्यानेंच पंजाबप्रांतावर स्वारी करून झेलम नदीच्या दक्षिणतीरापर्यंतचा मुलूख काबीज केला. नंतर त्याने इ. स. १७९७ व त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हां त्या प्रांतावर स्वारी करून त्यावेळीं शीख लोकांच्या ताब्यांत असलेले लाहोर शहर हस्तगत करून घेतले. त्या- समयी कित्येक शीख सरदारांच्या मनांत झेमानशहाबरोबर तह करून व त्यास कांहीं खंडणी देण्याचे कबूल करून त्याजपासून लाहोर शहर परत घ्यावें असें आलें; परंतु रणजितसिंगासारख्या शूर व निग्रही मनुष्यास तें कसें पसंत पडणार? ह्यावेळीं त्याचें वय सारें १७ वर्षाचें होतें, तथापि त्याची कुशाग्र बुद्धि व स्वातंत्र्यप्रीति ह्या दोहोंचें सम्मीलन त्याच्या अंतःकरणांत झाल्यामुळें त्यानें त्या शीख सरदारांच्या म्हणण्यास रुकार न देतां उलट त्यांपैकी कित्येकांची निर्भ- र्त्सना केली व कित्येकांस चांगलें प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या साहायानें आपलें लष्कर चांगलें तयार करून झेमान- शहावर चालून जाण्याची तयारी केली. नंतर लागलीच आपल्या हाताखालच्या एका विश्वासू सरदाराबरोबर कांहीं सैन्य देऊन त्यास सतलजनदीच्या दक्षिणेकडील प्रांत