पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२ )

उद्वस्त करून टाकण्याकरितां रवाना केलें. इतक्यांत दैवयोगानें असें घडून आलें कीं, अफगाणिस्थानांत एकाएकीं कांहीं राज्यप्रकरणी गडबड उडाल्याचे झमान- शहास समजल्यावरून त्यास तिकडील बंदोबस्ताकरितां जाणे भाग पडलें. तेर्णेकरून रणजितसिंगास व दुसऱ्या शीखसरदारांस प्राणनाश झाल्याशिवाय लाहोर शहर आपल्या ताब्यांत घेण्यास अर्थात् चांगलीच संधी मिळाली. तेव्हां झेमानशहानें हें जाणून रणजितसिंगास फसविण्याची एक मसलत काढिली, ती अशी. त्यानें कावुलाहून रणजितसिंगास निरोप पाठवून कळविलें कीं, "मी झेलम नदी उतरीत असतां तींत मजबरोबरच्या तोफांपैकी १२ तोफा पडून बुडाल्या आहेत, जर त्या तुम्ही वर काढून 'पेशावर' येथे पोहो- चत्या कराल तर मी लाहोर शहर व त्या भोवतालचा सर्व प्रदेश तुम्हांस देऊन 'राजा' हा किताब देईन.' रणजित्- सिंगास प्रथमत: है त्याचे म्हणणे खरें वाटलें व त्यावर भरंवसा ठेवून त्यानें नदींतून ८ तोफा बाहेर काढून त्या पेशावरास रवाना केल्या; परंतु त्यास पुढें असें कळलें कीं, झेनशहा फार कपटी मनुष्य आहे; त्याच्या बोलण्यावर बिलकुल विश्वास ठेवितां उपयोगीं नाहीं. ह्याकरितां बाकी राहिलेल्या तोफा नदींतून बाहेर काढण्याच्या भरीस न पडतां त्यानें आपण हस्तगत केलेलें ठिकाण शत्रूच्या हातीं पुन्हां न जाण्याविषयींचा बंदोबस्त केला. याच वर्षी 'नक्काईद' 'मिसलीचा मुख्य 'रामसिंग' याची कन्या 'राजकुवर' इज बरोबर त्याने आपले दुसरे लग्न लाविलें. असो.
 वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें रणजितसिंग झेमानशहाचें कृत्रीम ओळखून त्यास दाद न देतां इ. स. १७९९ त लाहोरच्या