पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

त्याजवर मारेकरी घालवून त्यास ठार करवावें. हा असा दुष्ट कट करण्याचें कारण एवढेच होतें कीं, रणजित्सिंगास नाहींसा केल्याविना तें शहर त्यांच्या हस्तगत होण्याची त्यांस मुळींच आशा नव्हती. रणजितसिंगास ह्या कटाची माहिती नव्हती, तरी पण त्यानें दरबारास जाण्याचें न नाका- रितां सावधगिरीनें आपल्या बरोबर निवडक परंतु पूर्ण विश्वासू असे कांहीं थोडे हत्यारबंद लोक घेऊन व त्यांस दरबारचे जागेच्या नजीकच छपून राहाण्यास सांगून आपण स्वतः दोनचार सरदार बरोबर घेऊन दरबारांत आला; तेव्हां कटवाले दरबारी लोकांस त्याची त्यावेळची भव्यमुद्रा आणि बरोबर असलेल्या लोकांची हुशारी व चौकसपणा पाहून आपला इष्ट हेतु साध्य होण्यापूर्वी आपल्यावर कोणकोणत वि ओढवतील याचा अंदाज होईना. नंतर त्यांनीं आपला दुष्ट हेतु सिद्धीस नेण्याऐवजीं वेळेवर नजर देऊन रणजित्- सिंगाचें उत्तम प्रकारें आदरातिथ्य केलें, आणि दरबार भरविण्याची कांहीं तरी सबब सांगून तो लागलीच बरखा- स्तही केला.
ह्या दरबारचा अंतस्थ हेतु रणजितसिंगास जरी कळला नव्हता तरी पण हैं भांगी सरदारांचें कांहीं तरी कपट आहे "असें खास जाणून त्यांच्याशी पर्यायानें तरी खुसपट काढून त्यांस जिंकावें, ह्या उद्देशाने त्याने इ. स. १८०२ च्या सुमारास त्या भांगी सरदारांकडे 'अमृतसर येथील किल्यावर एक प्रचंड व मजबूत अशी 'झमझमा' नांवाची तोफ होती, तिजबद्दल मागणें केलें. ह्या तोफेविषय एके ठिकाणी अर्से लिहिलेले आढळतें कीं, इ. स. १७६१ त अफगाण सरदार अहमदशहा अबदली यार्णे ही तोफ 'पानिपत' येथील