पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

घनघोर संग्रामाच्या वेळीं सदाशिवरावभाऊ पेशव्याच्या अफाट लष्करावर सोडण्याकरितां मुद्दाम लाहोर येथें तयार करविली होती. पुढे पेशव्यांच्या फौजेचा पराजय झाल्यावर त्यानें ती लाहोरच्या किल्यावर नेऊन ठेविली. नंतर इ. स. १७६४ त रणजितसिंगाच्या आजानें लाहोर काबीज करून झमझमा आपल्या हस्तगत करून घेतली. तदनंतर भांगशीख सरदारांचें वर्चस्व त्या प्रांतांत विशेष झाल्यामुळें त्यांनीं तेथून ती अमृतस- रच्या किल्यावर आणून ठेविली. सांप्रत ही तोफ लाहोर येथील पदार्थसंग्रहालयांत आहे. असो. रणजितसिंगाची ही मागणी जरी क्षुल्लक होती तरी ती जाणूनबुजूनच केली होती, म्हणून ती त्या सरदारांनीं अमान्य केली, यांत मोठेंसें नवल नाहीं. तेव्हां अर्थात् या अपमानाचा सूड म्हणून त्यानें अमृत- सरावर एकदम चाल करून किल्यांत असलेले सदई दोघे भांगशीख सरदार व रामगढिया जस्सासिंग या तिघांस तेथून हांकून लावून तो किल्ला व त्याभोवतालचा सर्व प्रदेश सर केला. ह्या जयामुळे रणजितसिंगाची महत्वाकांक्षा अधिकच दुणावत चालली. त्यानें ह्यानंतर सर्व शीख राजे व सरदार असेच जिंकून सर्व पंजाबप्रांतवर आपली सत्ता चालविण्याचा निश्चय केला.
कन्हैय्या मिसलीसंबंधानें आम्ही पूर्वी सांगितलेच आहे; तसेच या मिसलीचा व सुकरचकिया मिसलीचा रणजित्- सिंगाच्या पहिल्या लग्नानें निकट संबंध जुळला गेला हेंही पण आमच्या वाचकांच्या ध्यानांत असेलच. तथापि आम्हांस एथें असें सांगितलें पाहिजे कीं, वरील संबंधाच्या योगानें जो परिणाम घडून आला तो त्या मिसलीच्या व सदाकुवरच्या नाशास कारणीभूत झाला असे यापुढील विवेचनावरून लक्षांत