पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६)

येईल. कारण, कन्हैय्या जयसिंग मृत्यु पावल्यानंतर त्या मिसलीची सर्व सूत्रे सदाकुवरने आपल्या हातीं घेतली होती. सदाकुवरच्या स्वभावाविषयीं आम्ही यापूर्वी सांगितले असल्याकारणानें आतां त्याची द्विरुक्ति करण्याचे कारण नाहीं. तिला जे काय करावयाचे असे तें सर्व ती आपल्या स्वभावास अनुसरूनच करीत असे. रणजितसिंगास मात्र आपले हिताहित कळू लागल्यापासून तो तिचा आपल्या मनांत द्वेष करूं लागला होता व प्रसंगविशेष तिला नाहींशी करण्याची संधी पहात होता. असो. रणजितसिंगानें या मिसलीतील बडेबडे लोक आपल्यास अनुकूल करून घेतले •असल्याकारणानें सदाकुवरला एक प्रकारची चांगली दहशतं बसली होती; कारण आपला जांवई आपल्या कह्यांत आतां राहात नाहीं, इतकेंच नाहीं; तर तो कन्हैय्या मिसलीचा नाश करून त्यावर आपले कायमचें वर्चस्व खचित स्थापित करणार, अशी तिची पक्की खात्री झाल्यावरून तिनें पुढे कित्येक दिवस- पर्यंत कांहीं गडबड वगैरे केली नाहीं. नंतर लाहोर येथून दोन चार मैलांच्या अंतरांवर असलेले शहा- देश' नांवाचे एक ठाणें होतें त्या ठिकाणीं ती जाऊन राहिली. परंतु तेथूनही ती कांहीं दिवसांनीं वटाला येथें परत आली व तेथून इंग्लिशांशीं दळणवळण बांधून त्यांच्या भाश्रयाखाली सिस-सतलज प्रांतांत येऊन रहाण्याचा तिनें शेवटचा विचार केला. हें वर्तमान रणजितसिंगास कळ- तांच त्यानें तीस बोलावणें पाठविले; परंतु तिनें त्या चोलावण्यास न जुमानितां वटाल येथून गुप्तपणे निघून जाण्याची तयारी केली. ह्यामुळे शेवटीं असें झालें कीं, णजितसिंग फार रागास जाऊन त्यानें लागलेच आपले कांहीं