पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १७ )

स्वार पाठवून त्यांकडून वाटेंत तिला तिच्या मेण्यासह पक - डून लाहोर येथें आणविलें; परंतु ती तेथे आल्यावर कांहीं दिवसांनी तिचा तेथेच अंत झाला.,br>  ह्याप्रमाणें सदावरच्या मृत्यूनें रणजितसिंगाचा इष्ट हेतु पूर्ण झाला; तथापि कन्हैय्या मिसलीचा सर्व कारभार त्याच्या हाती येण्यास त्यास बराच त्रास सोसावा लागला. रणजित्- सिंगास वर सांगितलेल्या १२ मिसलींपैकीं आतां कोणीही शत्रू उरला नाहीं असे म्हटल्यास फारसा बाध येईल असें नाहीं. कारण त्या त्या मिसळींतील बहुतेक शीखराजे व सरदार, रणजितसिंगाचा उत्तरोत्तर दिग्विजय होत चालला आहे असें पाहून त्याजबरोबर मित्रत्वाच्या नात्यानें वागूं लागले. तथापि त्या प्रांतांत दरीखोऱ्यांत राहणाऱ्या कांहीं अडाणी व रानटी मुसलमान लोकांच्या टोळ्या होत्या त्यांज- पासून मात्र त्यास वारंवार उपद्रव होत असे, परंतु हळूहळू स्यांचाही त्या हिम्मतबहाद्दराने यथावकाशाने पुरता नाश करून टाकिला.