पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )
भाग १.

सिस् - सतलज प्रांतासंबंधानें रणजितसिंगाचा विचार - यशवंतराव होळकर - त्यास पतियाळच्या राजाचा आश्रय-तेथून त्याचें जाणें- रणजितसिंग, भवानसिंग, आणि भागसिंग यांचे त्यास साहाय्य करण्याविषयीं झालेलें संगनमत-रणजित्सिंगाचा व कंपनी सरकारचा तह-पतियाळचा राजा व भागसिंग या उभयतांत तंटा- तो मिटवण्यास रणजितसिंगाचें जाणे - कर्नाळा येथे कंपनी सरकार लष्कर पाठ- वितं-सी. टी. मेटकाफ् - त्याची वरण- जितसिंगाची मुलाकत - फ्रैचसरकार व कंपनीसरकार यांमध्ये लढाई हो- ण्याची चिन्हें कंपनी सरकारचा व रणजितसिंगाचा तह इ०
 मागील प्रकरणांत आमच्या चरित्रनायकाचे तीर्थरूप महानसिंग निवर्तल्यापासून तों त्यानें आपल्या पराक्रमानें स्वतःस स्वातंत्र्य मिळवून घेईपर्यंत आम्ही वाचकांस बहुतेक माहिती करून दिली आहे. आतां यापुढील भागासंबंधानें म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणें दरीखोऱ्यांत राहणारे रानटी मुसलमान लोक व त्याचप्रमाणें पंजाब प्रांताच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत राहणारे युसफजाई वगैरे अडदांड लोक आणि इंग्रजलेोक या सर्वांशीं रणजितसिंगाची वागणूक कशी होती वगैरे संबंधानें आम्ही लिहिण्याचे योजिलें आहे. प्रथमतः त्यावेळी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी हिंदुस्तानांत गाजत असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीचा अथवा कंपनी सरकारचा आणि प्रस्तुत चरित्रनायकाचा जो संबंध जुळला, तत्संबंधाची हकीकत आम्ही येथें सादर करितों.<br.