पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )

 इ. स. १८०३ साली इंग्लिशांनी मराठ्यांच्या सैन्याचा 'दिल्ली' व 'लासवारी' ह्या दोन ठिकाणीं पराभव करून आपलें निशाण 'सिस् - सतलज टेरीटरी ' सतलज नदीच्या कांठचा प्रदेश ) वर आणून रोविलें. नंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे इ. स. १८०४ त यशवंराव होळकराने इंग्रज सेनापती कर्नल ' मानसन् ' याचा पराभव करून त्यास दिल्ली येथें वेढा दिल्याचे समजल्यावरून कर्नल 'ऑक्टर लोनी' व ' बर्न' ह्या दोषां इंग्रज सरदारांनी होळकरावर चाल करून मोठ्या हिम्मतीनें तो वेढा उठविला. हैं कृत्य झाल्यानंतर यशवंतरावानें कांहीं दिवसपर्यंत फारशी हालचाल न करितां पंजाब प्रांतांतील सतलननदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांत नवीन लष्कर जमविण्याची खटपट सुरू केली. तो प्रथम पतिया - ळच्या राजाकडे कांहीं दिवस येऊन राहिला; परंतु त्या राजानें असें पाहिलें कीं, आपण होळकरास आश्रय दिल्याचे कंपनी- सरकारास समजलें तर तें त्या सरकारास मान्य होणार नाहीं; कारण आपला व त्या सरकारचा जो पूर्वीपासून सलोखा आहे त्यांत व्यत्यय येऊन तें जबरदस्त सरकार आपल्या राज्यावर कदाचित् चालून येऊन आपला सूड उगवून घेईल. या भीतीमुळे त्यानें यशवंतराव होळकरास तेथून निघून जाण्यास सांगितले. सदरहू प्रमाणेंच त्या प्रांतांतील दुसऱ्या शीख संस्थानि- कांनीही त्यास मदत दिली नाहीं. यामुळे यशवंतराव होळकरास हताश होऊन अमृतसराकडे यावें लागलें. तेथें आल्यावर त्याची आणि आमचा चरित्रनायक रणजितसिंग, फत्तेसिंग अहलु- वालिया व झिंदचा राजा भागसिंग या त्रयीची गांठ पडली. परंतु हें वर्तमान इंग्रज सरदार जनरल 'लेक' यास समज- तांच तो होळकराचा पाठलाग करण्याकरितांइ. स. १८०१ च्या