पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २० )

ऑक्टोबर महिन्यांत आपल्या फौजेंनिशीं अमृतसराकडे येऊन दाखल झाला. इतक्यांत त्यास कलकत्त्याच्या गव्ह- रनर जनरलाकडून रणजितसिंगाबरोबर मैत्रीचा तह करण्या- बाबद लिहून आल्यावरून त्यानें इ. स. १८०६ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेस रणजितसिंगाबरोबर तह केला. ह्या तहाचीं कलमें अशीं होती:- ( १ ) यशवं- तराव होळकर यास आश्रय न देतां त्यास अमृतसर येथून जाण्यास सांगावें. ( २ ) होळकरास कोणत्याही प्रकारें सदरील शीख सरदारांनी साहाय्य करूं नये. ह्याप्रमाणें हा दुकलमी तहनामा झाल्यावर लागलीच कंपनी सरकाराने त्याचा मोबदला म्हणून असें ठरविलें कीं, ' सदरील तीन असामींनी ह्रीं वरील कलमें पूर्णपणें पाळिल्यास कंपनी सरकार त्यांच्या मुलखांवर आपलें लष्कर न पाठवितां शत्रूपासून त्यांचें चांगलें संरक्षण करील " ह्यावरून रणजितसिंग व कंपनीसरकार यांचा स्नेहसंबंध कसा जुळला हे आमच्या वाचकांच्या सहज लक्षांत येण्याजोगे आहे.

 रणजितसिंगानें सतलजनदीच्या उत्तरेकडील प्रांतावर आपले वर्चस्व पूर्वीच बसविलें होतें हैं आम्ही मार्गे सांगितलें आहे; तथापि त्या प्रांताची व्यवस्था बरोबर लागली नस- ल्यामुळे त्यांत वारंवार तंटे बखेडे उद्भवत असत.प्रत्यक्ष रणजित्सिंगाचा मामा म्हणजे झिंदचा राजा भागसिंग आणि पतियाळचा राजा साहेबसिंग ह्या दोघांमध्यें तंटा उपस्थित झाला होता; म्हणून झिंदच्या राजाच्या बोलावण्यावरून रण- मिसिंगास तो तंटा मिटविण्याकरितां सतलज नदी उतरून दक्षिणेकडे जाणे भाग पडलें. तो तारीख २६ माहे जुलै इ. स. १८०६ रोजी सतलज उतरून गेला; परंतु हे वर्तमान