पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )

कंपनी सरकारास कळतांच त्या सरकाराने 'कर्नाला ' येथे आपली फौज आणून ठेविली. त्या सरकारास असें वाटलें कीं, न जाणों, आपण दोस्त या नात्यानें ज्याचें संरक्षण करीत आहों त्या पतियालच्या राजावर कांहीं घोरपड आल्यास . रणजितसिंगाबरोबर आपणास झगडावें लागेल, 'कर्नाला ' है 'पानिपत' येथून सुमारें १८ कोसांवर आहे. त्या ठिकाणी, वास्तविक पाहतां, कंपनीसरकारास फौज आणून ठेवण्याची कांहीं जरूरी नव्हती; कारण रणजितसिंगाची त्या सरकारास जी मीति वाटत होती ती अगदी निरर्थक होती. असो. रणजितसिंगार्ने वरील तंटा अगदीं बिनबोभाट व सलोख्याने मिटवून तेथून लवकरच तो लाहोरास आला. परंतु त्यानें परत येतेवेळी इतकें मात्र केलें कीं, वाटेंत 'लुधियाना ' व ' घुमग्रण' हीं दोन शहरे आपल्या हस्त- गत करून घेतलीं. वाचकहो, आपण आतां अमळ येथें थांबून युरोपांत कंपनीसरकारावर येऊ पाहणाऱ्या अरिष्टाकडे वळू. कारण आमचा चरित्रनायक आणि कंपनी सरकारचा दोस्त ह्याचा वरील कारणामुळे त्या सरकाराशीं आणखी अधिक संबंध येऊ पहात आहे. तो प्रकार असा.

 यूरोपांत फ्रेंचसरकार व कंपनी सरकार या दोहोंमध्यें जो पूर्वापार मत्सर उत्पन्न झाला होता त्यास कालमानाप्रमाणें नूतनांकुर फुटत चालल्यामुळे हिंदुस्तानांतील इंग्रज लोकांस फ्रेंचांची पुन्हा भीति वाटू लागली होती; म्हणून त्यांच्या बंदोब- स्ताची इकडे चांगली तयारी करावी या हेतू में कंपनी सरकारानें आपल्या दोस्तांकडे विनंती पत्रें व वकील पाठवून त्यांजकडून प्रसंगी चांगली मदत होईल अशी तजवीज चालविली. त्याप्रमाणे इ. स. . १८०८ च्या आगष्ट महिन्यांत कलकत्त्याच्या गव्हर नर जनरलानें