पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२ )

कोणी सी. टी. मेटकाफ् नामक कर्नाला येथें असलेल्या आपल्या वकीलास रणजितसिंगाकडे पाठविलें. त्या मेटकाफ् साहेबाची व रणजितसिंगाची भेट ' कासूर ' येथें तारिख ११ सप्टेंबर रोजीं झाली. त्यासमयीं त्या साहेबानें कंपनीसरकारातर्फे रणजितसिंगास जें सांगितले त्यांतील सारांश येणेंप्रमाणे होता:-" फ्रेंच सरकारानें हिंदुस्तानां- तील कंपनी सरकारच्या मुलुखावर स्वारी केली असतां लाहोर दरवाराने कंपनी सरकाराबरोबर में नुकतेच मित्रत्वाचें नातें संपादिलें आहे, तें कायम राखून फ्रेंच लोकांस हांकून लाविण्याच्या कामी पूर्ण मदत केली पाहिजे.” त्यावर रण- जितसिंगानें मेटकाफ् साहेबास असें उत्तर दिलें कीं " मी कंपनीसरकारच्या विचारा बाहेर नाहीं. फक्त माझी एवढीच विनंती आहे कीं, कंपनी सरकाराने सतलज नदीच्या दक्षिणे- कडील प्रांतांतील सर्व शीख संस्थानांवरील माझें वर्चस्व कायम राखावें. " मेटकाफ् साहेबास रणजितसिंगाचें हें म्हणणें मान्य करण्यास त्यावेळी मोठी पंचाईत पडली; परंतु आपण हा सर्व मजकूर गव्हरनर जनरलाच्या कानांवर घालून मग काय तो जबाब देऊं असें सांगून तो साहेब तेथून 'अंबाला' येथें निघून गेला. नंतर रणजितसिंगानें सतलज नदीवरील फरीदकोट, मालरकोटला, आणि खाय ह्याठिकाणीं जाऊन तेथे असलेल्या शीख अधिकाऱ्यांकडून खंडणी घेतली. वास्तविक पहातां ह्रीं ठिकाण कंपनी सरकारच्या आश्रयाखालीं होतीं व त्याबद्दल कंपनीसरकारास अभिमानही वाटत होता; परंतु मेटकाफ् साहेबानें प्रसंगास अनुसरून तिकडे फारसे लक्ष दिलें नाहीं. तथापि रणजितसिंगाकडून हा जो कंपनी सरकारचा उपमर्द