पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

झाला त्याचा मोबदला तें सरकार घेतल्यावांचून राहणार नाहीं हैं तो साहेब पक्के समजून होता.
 हे वरील वर्तमान घडल्यानंतर रणजितसिंगानें असा विचार केला कीं, जरी फ्रेंच लोकांची आणि कंपनीसरकारची हिंदुस्ता- नांत लढाई जुंपली तरी आपल्यास तत्संबंधानें भीति बाळगण्याचें कारण दिसत नाहीं. फ्रेंच लोक आपले शत्रू नाहींत, ते इंग्रजलोकांचे शत्रू आहेत आणि यद्यपि त्यांचा व कंपनी सरकारचा सामना झालाच तर इंग्रजलोक आपल्यास मदतीकरितां बोलावितील हें निश्चित आहे; व तसें झालें म्हणजे मग आपला वरील मतलब सिद्धीस जाण्यास फारसा अडथळा येणार नाहीं. असा विचार करून त्यानें 'शहाबाद' घेऊन तो अमृतसर येथें निघून गेला. तेथें आल्यावर त्याची व मेटकाफ् साहेबाची तारीख १० दिजंबर रोजीं पुन्हां भेट झाली. परंतु ह्या भेटीच्या वेळीं रणजितसिंगास वकीलाचा अंतर्भाव कांहींसा निराळा भासला. वकील मेटकाफू साहेबानें रणजित्- सिंगाच्या पहिल्या भेटींत घडलेल्या मजकुराची हकीकत कलकत्त्यास कळविली होती. तिचा गव्हरनर जनरलाने विचार करून सदरहू वकीलामार्फत रणजितसिंगास असें स्पष्ट कळविलें कीं " आम्हांस फ्रेंच सरकारची हा वेळ पर्यंत जी भीति वाटत होती ती बहुतेक कमी झाल्यामुळे हिंदुस्तानां - तील रजवाड्यांपैकी कोणाच्याही मदतीची आतां जरूर नाहीं असें रणजितसिंगास सांगावें; आणखी त्यास असेंही कळवावें कीं, मराठ्यांच्या व आमच्या सरहद्दीसंबंधाने ज्या वारंवार कटकटी होत असतात ती सरहद्द सतलज नदी असून तिच्या कांठच्या दक्षिणेकडील भागावर आमचा पूर्ण अंमल बसला असल्याकारणानें त्या भागांत जे शीख