पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४ )

राजे व सरदार असतील त्यांजवर जे तुम्ही आपलें वर्चस्व सांगत आहां तें कंपनी सरकारास बिलकूल मान्य नाहीं."
ह्या वरील खात्याचा मथितार्थ रणजितसिंगाने जाणून आपले लष्कर व युद्धोपयोगी सर्व सामान अमृतसर येथें त्यानें नवीन बांधलेल्या 'गोविंदगड' नामक किल्यांत नेऊन ठेविलें कारण त्यास असें वाटलें कीं, कंपनीसरकारचा व आपला जरी स्नेहवर्धक तह झाला आहे तरी, तो यापुढे कायम राहून त्याचा परिणाम चांगल्या प्रकारें घडून येईल अशी आशा बाळगणे व्यर्थ आहे; म्हणून त्यानें वर सांगितल्या- प्रमार्णे बंदोबस्त करून आपला विश्वासू व हुशार सेनापति सरदार मोकमचंद ' ज्यास ' कांगरा दरी' घेण्याकरितां रवाना केलें होतें, त्यास बोलावून आणून त्यासह त्यानें लुधियाना शहरानजीक सतलज नदीच्या कांठच्या 'फिलोर ' गांवाकडे कूच केलें. हा फिलोर गांव कंपनसिरकाराकडे होता; म्हणून गव्हरनर जनरलास कळतांच त्यानें इंग्रज सेनापति कर्नल ऑक्टर लोनी त्यास फौजेसह लुधियानाकडे जाण्याचा हुकूम दिला. त्यासमयीं उभयपश्चाची लढाईची तयारी झाली; परंतु रण- जितसिंगास कंपनीसरकाराशी लढत बसणें हैं तत्कालीन अगर्दी नाजूक स्थितीस उचित नव्हते. याचे कारण हें आहे की, त्यावेळीं त्याचे शत्रू जे दुसरे शीख राजे, ते त्याच्या विरुद्ध गुप्त काची योजना करीत होते; म्हणून कंपनी सरकारशी लढ- यापेक्षां असल्या गुप्त कटवाल्यांचा समूळ नाश करावा हा उत्तम पक्ष, असें समजून रणजितसिंगार्ने तारीख २५ माहे एप्रील इ. स. १८०९ रोजीं एक तहनामा तयार केला आणि त्यावर आपली सही करून तो मंजुरीकरितां कलक- त्यास गव्हरनर जनरलाकडे रवाना केला. त्यांत त्यानें