पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )
भाग ४.

रणजितसिंगाचें मुल्तान, काश्मीर, व पेशावर घेणें-तत्संबंधानें लढाया बंगेरे- बरक झाई, युसुफझाई, कावली पठाण वगैरे लोकांस जिंकणे -इ.  इराण देशाचा बादशाहा प्रसिद्ध नादीरशहा ह्यानें इ. स. १७३८ त हिंदुस्तानच्या उत्तरेकडील प्रांतावर स्वारी करून दिल्ली पर्यंत येऊन तें शहर काबीज केलें हैं सर्वांस माहीत आहेच. त्यावेळीं ' मुलतान' मोवतालचा प्रदेश एका अफगाण नबाबाच्या ताज्यांत होता. तदनंतर इ. स. १७७१ पासून इ. स. १७७९ च्या दरम्यान तो सर्व प्रदेश भांगी शीख राजांच्या ताब्यांत आला. परंतु ह्या शेवटच्या वर्षी म्हणजे इ. स. १७७९ त दिल्लीचा बादशहा तैमूर किंवा तिमूर ह्यानें मुलतान येथील शीख भांग्यास हांकून लावून 'मुझफरखान' नामक आपल्या एका सरदारास त्या प्रांताचा सुभेदार नेमिलें. ह्या मुझफरखानास अल्पवयी रणजितसिंगाच्या शौर्याबद्दलची हकीकत ह्यापूर्वी कळली होती व तो मुलतान घेण्याकरितां आपल्यावर स्वारी केल्यावांचून राहणार नाहीं हेंही तो पूर्णपणे समजून होता; म्हणून त्यानें असें केलें कीं, रणजित्- सिंग जेव्हां त्या प्रदेशाची माहिती करून घेण्याकरितां मुलतानच्या उत्तरेस २० मैलांवर 'महातम' नांवाच्या ठाण्यास येऊन दाखल झाला, तेव्हां त्याची मुलाकत घेऊन त्यास नजराण्यादाखल ७० हजार रुपये देऊन माघारें परतविलें. परंतु इतक्यानें लोभी रणजितसिंगाची तृप्ति न होतां