पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )

त्याला मुलतानवर स्वारी करून तें काबीज करून घेण्याची अधिकच इच्छा उत्पन्न झाली.
 वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें मुझफरखानापासून नजराणा घेऊन रणजितसिंग लाहोर येथें आल्यावर त्यानें आपल्या सैन्याची जय्यत तयारी चालविली; कारण त्यावेळीं मुझफर- . खानाच्या तैनातींत जे कांहीं शूर शीख सरदार होते त्यांनी त्या किल्ल्याचा फार उत्तम प्रकारचा बंदोबस्त करून ठेविला होता. रणजितसिंगानें इ. स. १८१० च्या फेब्रुवारी महि- न्याच्या २४ व्या तारखेस लाहोर येथून आपल्या फौजेनिशीं येऊन मुलतान नजीक तळ दिला, आणि दुसऱ्याच दिवशीं र्ते शहर हस्तगत करून घेतले; पण तेथील किल्ला मात्र त्याच्या हस्तगत झाला नाहीं. कारण त्या किल्ल्याच्या संरक्ष- णार्थ पूर्वी सांगितल्याप्रमाणे शूर शीखलोकांचा बराच भरणा असल्यामुळे रणजितसिंगाच्या लष्करास किल्ल्यांत घुसण्यास फारच अडचण आली. शीख लोक जरी त्या वेळीं मुसलमान सरदाराच्या तैनातीत होते तरी ते इमानी, व धनी म्हटला म्हणजे त्यास आपल्या प्राणापेक्षांही अधिक मानणारे, हैं आमच्या वाचकांस इ. स. १८५७ सालच्या शिपाई लोकांच्या धामधुमीच्या इतिहासावरून कळून येईल. असो. . मुल- तानच्या किल्ल्यास रणजितसिंगाच्या लोकांनी वेढा दिला होता, तथापि आंतील लोकांनीं बरेच दिवसपर्यंत त्यांस मुळींच दाद दिली नाहीं. शेवटीं निरुपायास्तव किल्ल्यांतील लोकांनी आंतून सुरूंग लावून भोवतालची तटबंदी उडवून देऊन रणजितसिं- गाच्या तोफखान्यावरील मुख्य सरदार 'अतारसिंग धारी ' व आणखी १२ लोक यमसदनास पाठवून दिल्यामुळे बाहेरील लोकांनी वेढा उठवून पिच्छेहाट केली. नंतर मार्च