पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )

महिन्याच्या २१ व्या तारखेस पुन्हा एकवार उचल खाऊन रणजितसिंगाने किल्ल्यावर हल्ला केला; परंतु त्यांतही त्यास यश आले नाहीं. शेवटीं आणखी चार दिवसांनी म्हणजे तारीख २५ रोजी रणजितसिंगाच्या लोकांनी मोठा हिय्या करून आपल्या देवाची परीक्षा पहाण्याचा विचार मनांत आणिला; परंतु पूर्ववत् ह्याही खेपेस त्यांस मार्गे हटावें लागले. ह्यावेळी रणजितसिंगानें आपला हुशार सेनापती दिवाण मोकमचंद एकाएकीं फारच आजारी पडला, व दुसरे कित्येक सरदार मृत्युमुखी पडले असें पाहून मुझफर- खानाबरोबर तहाचें बोलणें लाविलें हें तहाचें बोलणें त्या खानासही पसंत पडलें; कारण ह्या वेढ्यांत त्याचाही अतिशय नाश झाला होता. ह्या तहामुळे रणजितसिंगास खानापासून अडीच लाख रुपये, वीस लढाऊ घोडे आणि लढाईचा खर्च हीं मिळाली. त्यापैकी ३० हजार रुपये तर त्याने त्याचवेळी रोख घेऊन तो एप्रिल महिन्याच्या १४ व्या तारखेस मुलतान सोडून लाहोराकडे निघून गेला.
 मुलतानचा किल्ला आपल्या हातीं लगत नाहीं असें पाहून रणजितसिंगानें तो घेण्याचें काम कांहीं दिवस पर्यंत लांबणीवर टाकून काश्मीर प्रांत घेण्याचा विचार केला, व त्याप्रमाणें त्यानें त्या प्रांताकडे इ. स. १८९१ त आपला मोर्चा फिरविला. काश्मीर व त्या भोवतालचा प्रदेश ' हिमा- लय पर्वतांत असल्यामुळे त्या प्रदेशाचा बंदोबस्त ईश्वर- निर्मित झालेला आहे हे येथे नव्याने सांगण्याची जरूरी नाहीं. अशा बिकट प्रदेशावर स्वारी करणें मोठ्या खर्चाचे व प्रयासाचें काम आहे हें स्पष्ट दिसत होतें. असें असतां रणजितसिंगानें त्या प्रदेशावर स्वारी करण्याचे योजिले हैं