पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )

  त्यावेळच्या एकंदर स्थितीवरून पाहिले असतां त्यानें खरो- खर मोठेच धाडस केलें असें कोण म्हणणार नाहीं ? असो. ह्या स्त्रात रणजितसिंगानें प्रथमतः असें केलें कीं, ही मोहीम चालू करण्यापूर्वी " भिंचर व ' राजिवरी ही दोन डोंगरी संस्थानें अनुक्रमें कुलुजातीच्या रजपूत आणि मुसलमान राजांपासून इ. स. १८१२ त घेऊन आपल्या फौजेस जाण्यायेण्याचा मार्ग खुला करून दिला. नंतर त्यानें काबूलच्या राजाचा मुख्य वजीर 'फत्तेखान ' हा सिंधुनद उतरून काश्मीरप्रांत घेण्याच्या उद्देशानें येत असतां त्याची भेट घेऊन आणि त्याजबरोबर कांहीं सवलतीच्या गोष्टी बोलून त्याची मैत्री संपादिली. परंतु ह्या मैत्रीत फारसा अर्थ नहता; कारण ते पूर्वीपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. इतकी व्यवस्था झाल्यावर रणजितसिंगाने आपला सरदार मोकमचंद यास काश्मीरावर पाठविण्याचा विचार कायम करून फत्तेखान वजीर त्या प्रांतांत शिरण्यापूर्वीच त्यास लाहोर येथून रवाना केले. मोकम चंदास काश्मीरच्या रस्त्याची माहिती नसल्यामुळे पदभ्रष्ट राजिवरी संस्थानच्या नवाबास २९ हजार रुपयांची लालूच दाखवून त्यास त्यानें आपल्या बरोबर घेतलें. तदनंतर ते आपल्या सैन्यासह दरकूच दरमजल करीत मार्गात फत्तेखान वजीर 'शेरगड' व 'हरीपर्वत' ह्या नांवाचे दोन किल्ले होते ते घेत असतां त्यास येऊन मिळाले. तेव्हां ह्या दोन्ही किल्ल्यांतील लूट फसेखानाच्या व मोकमचंदाच्या · लोकांनी केली, परंतु त्यावेळीं फत्तेखानानें मोकमचंदास स्प- ष्टपणें असें सांगितलें कीं, ह्या लुटीचा भाग शीख सैन्यास मिळणार नाहीं. हें वर्त्तमान मोकमचंदानें लाहोर येथें रणजित्- सिंगास कळवून आपली फौज काश्मीरच्या रस्त्याने चालविली.