पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३० )

  रणजितसिंगाने फत्तेखानाचें कपट पूर्वीच जाणिलें होते. व त्याचा प्रत्ययही त्यास त्यैकरच आला; म्हणून त्यानें काश्मीरच्या पूर्वीच्या सुभेदाराचा भाऊ 'जहान्दा दखान जो सिंधुनदाच्या कांठीं 'अटक ' येथें होता, त्यास अनुकूल करून घेऊन तेथील किल्ला आपल्या ताब्यांत घेतला. हा - त्यावेळी फत्तेखानाच्या वर्चस्वाखालीं असून त्याजवर जहा- दादखानाची नेमणूक झालेली होती; म्हणून फत्तेखानास हैं वर्तमान कळतांच तो काश्मीर घेण्याचें सोडून देऊन अटक येथें इ.स. १८१३ च्या एप्रील महिन्यांत दाखल झाला. तेव्हा सरदार मोकमचंद्रासही त्याच्या मागोमाग अटक येथे येणे भाग - पडलें. मोकमचंदाच्या लष्कराचा तळ अटकेनजीक 'हैदारू येथें पढला होता. नंतर जुलै महिन्याच्या १३ व्या तारखेस -लढाईस तोंड लागलें, 'दोस्त महमदखान' जो पुढे काबूलचा राजा म्हणून प्रसिद्धीस आला, तोही ह्या लढाईत फत्तेखान वाजेरास फौजेनिशी येऊन मिळाला. ह्या सर्व काबुली लष्करानें मोक- मचंदाच्या हाताखालच्या सैन्याची फळी फोडून त्याची फार दाणादाण करून टाकिली. तेव्हां अफगाण लोकांस आपला जय झाला असें वाटून ते लुटालूट करू लागले; परंतु लागलीच मोकमचंदाने आपले खास ठेविलेले लोक बरोबर घेऊन व शत्रु बेसावधपणें लुटालूट करीत आहे असे पाहून त्याजवर मोठ्या शिताफीनें हल्ला केला. तो हल्ला त्या अफगाण लोक्तंस इतका असह्य झाला की, त्यांस पळतां भुई - थोडी झाली. फत्तेखान वजीर तर ह्या हल्यांत कोणीकडे पळून गेला त्याचा मोकमचंदास पलासुद्धां लागला नाहीं. असो. वाचकहो, रणजितसिंगाच्या कारकीर्दीत अफगाण लोकांची - शीख लोकांची जी पहिली लढाई झाली ती हीच होय.