पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३१ )

 तदनंतर दुसयावर्षी म्हणजे इ. स. १८११ स रणजित्- सिंगास असें वाटलें कीं, ह्यापुढें फत्तेखान काश्मीर घेण्याच्या बखेड्यांत पडणार नाहीं, म्हणून आपण एकट्यानेंच आतां त्या प्रांतावर स्वारी करून तो जिंकून घ्यावा. परंतु या मसलतीस त्याचा सरदार व सेनापती मोकमचंद अनुमोदन देईना. कारण तो ह्यावेळींसुद्धां आजारी पडला होता व आतां स्वारीचें काम आपल्या हातून पार पडेल अशी त्यास खात्रीही नव्हती; शिवाय त्यावेळी दुसरे डोंगरी संस्थानिकही रणजितसिंगाविरुद्ध झाले होते. परंतु ह्या दोन्ही गोष्टींकडे रणजितसिंगार्ने लक्ष न देतां आपल्या सैन्याचे दोन भाग करून एका भागाचें अधिपत्य मोकमचंदाचा नातू 6 रामदयाळ " याजकडे देऊन दुसया भागाचे अधिपत्य भय्या रामसिंग' याजकडे दिले. हा रामदयाळ आपल्या माजाप्रमाणेंच शूर असून लढाईच्या कामांत चांगला वाकब गार होता, त्याने ह्या मोहिमेचें काम आपल्या शिरावर घेऊन तो आपल्या सैन्यासह ' सियालकोड ' येथे येऊन दाखल झाला; पण पुढील मार्ग फार अडचणीचा आहे असें पाहून त्यास आपण मोठ्या संकटांत येऊन पडलो असे बाहूं लागलें. नंतर राजिवरी संस्थानचा राजा ' अगरखान यानें त्यास असे सुचविलें कीं, येथून आतां आपलें लष्कर कांहीं *" पंच' मार्गीनें व कांहीं " ब्रह्मगाला ' या मार्गानें काश्मीर प्रदेशांत न्यावे, तेव्हां ह्या वरील सूचनेप्रमाणें रामदया- ळाने आपले लष्कर सदरहू दोन्ही रस्त्यांनी चालू केलें. नंतर

  • पंच व ब्रह्मगाला हे दोन डोंगर फार उंच असून काश्मीरच्या पायथ्याशी आहेत. ह्या डोंगरांतून काश्मीरापर्यंत जाणारे जे पायमार्ग आहेत ते फार बिकट असून कधीं कधीं बर्फाच्छादित असतात.