पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२ )

रामदयाळ ज्या तुकडीबरोबर होता ती तुकडी * पीरपंजल घांट उतरून पलीकडे गेली नाहीं तोंच अकस्मात् काश्मी- रच्या सुभेदाराच्या लोकांनी त्या तुकडीवर हल्ला केला. त्या वेळी रामदयाळ आणि त्याचे लोक वाटेचे श्रम व त्रास ह्यामुळे अगदी थकून गेले होते. तथापि त्या शीख लष्करानें आपल्या बीदास जागून हल्ला करणाऱ्या लोकांबरोबर निकराने लढून बराच वेळ पावेतों टिकाव धरिला. इतक्यांत दुसरी टोळी रामदयाळास येऊन मिळाल्यामुळे त्यास कांहीं धीर येऊन त्याने पुढील मार्ग स्वीकारला. तरी अफगाण लोक त्यास मधून मधून आडवे येतच असत. रामदयाळास हा वेळ पावेतों भय्या रामसिंग याची कांहींच मदत झाली नाहीं. कारण तो त्यापासून मार्गे बराच दूर राहिला होता. ह्या वरील अफगाण लोकांच्या हल्यांत रामदयाळाचें बरेंच नुकसान होऊन लोकही फार मारले गेले. त्याचे चांगले चांगले शिपाई बरेच मेल्यामुळे त्याचें धैर्य थोड़ेंसें खचल्या सारखें झालें होतें; तथापि भय्यारामसिंगाचे लोक येऊन मिळाल्यावर त्या हिम्मतवाहद्दरानें आणखी एकदां काश्मीरी सैन्यास गांडून त्यास पुरा हात दाखविण्याचा निश्चय केला. परंतु अफगाण सुभेदार 'अझीमखान ' ह्यानें त्याचें कांहीं चालू दिले नाहीं. नंतर रामदयाळानें पंजाबाकडे परत येण्याचें ठरवून आपले सर्व सैन्य लवकरच माघारें आणिलें.
 रामदयाळ ह्याप्रमाणें पंजाबकडे परत आला है पाहून रणजितसिंगास वाईट वाटले, तरी त्याची उत्साहबुद्धि व महत्वाकांक्षा कमी न होतां त्याने आपला उद्योग सततू चालू ह्यास परिपांचाल घांट असे म्हणतात. हा काश्मीरच्या पश्चिमेस २४ मैलांवर असून ११४०० फूट उंच आहे.