पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

ठेविला होता. त्यानें ह्यापुढें काश्मीर प्रांताची व डोंगरांतील रस्त्यांची चांगली माहिती करून घेऊन इ. स. १८१९ त आपला दिवाण 'मिसरचंद ' याजबरोबर प्रचंड सैन्य देऊन त्याच्या हाताखालीं सरदार रामदयाळ याची योजना केली. हे प्रचंड शीख लष्कर काश्मीर घेण्याकरितां निवालें असतां मिसरचंदास असे समजलें कीं; काश्मीरचा सुभेदार अझीमखान हा तेथें नसून तो काबूलास कांहीं कामाकरितां निघून गेला आहे व त्याच्या पाठीमार्गे दुसरा हुशार मनुष्य तेथे कोणी नाहीं; म्हणून मिसरचंदानें दरकूत्र दरमजल करून काश्मीरानजीक येऊन तेथें आपल्या लष्कराचा मोठ्या बंदोबस्तानें तळ दिला. हे प्रचंड लष्कर आतां सर्व काश्मीरदेश उद्वस्त करून टाकिल्यावांचून राहणार नाहीं असें तेथें 'झबरखान नांवाचा एक सरदार होता त्यास वाटून व अफगाण फौजही अस्ताव्यस्त झालेली आहे ती पुन्हां एकत्र करून शत्रूशीं टक्कर मारण्यास कोणी छातीचा सरदार नाहीं अशी त्याची' खात्री त्याने काश्मीर मिसरचंदाच्यास्वाधीन केले. नंतर लवकरच झालेली सर्व हकीगत मिसरचं- दानें लाहोर येथें रणजिसिंगास कळविली, तेव्हां आपण कृत- कृत्य झाले व मिसरचंदास फारसे आयास नपडतां काश्मीर. हस्तगत करून घेतां आलें ह्यावरून आपल्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे असे समजून तो आनंदित झाला. मुलतान घेण्यास जो त्रास व जे श्रम त्यास पडले ह्या मोहिमेंत त्यास कमी त्रास असो. ह्याप्रमाणे काश्मीर प्रांत रणजितसिंगाच्या ताब्यांत आल्यावर त्यानें त्या प्रांताचा बंदोबस्त करण्याकरितां दिवाण मोकमचंदाचा पुत्र ‘मोतिराम ' ह्यास तेथील सुभेदार नेमून