पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४ )

पाठविलें. नंतर मिसरचंद आपल्या लष्करासह त्या प्रांतांतून जिकडे तिकडे बंदोबस्त करीत पंजाबाकडे येण्यास निघाला.
 वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे मुलतान व काश्मीर हे प्रदेश घेतल्यावर रणजितसिंगानें ' पेशावर ' प्रांत काबीज करण्याचे योजिलें. हा प्रदेश त्यावेळी अफगाणिस्थानचा राजा ' यार महमदखान ' याजकडे होता; आणि त्याचा भाऊ ' महमद अझीमखान ' हा वजीर फत्तेखान याच्या मागून त्याचा मुख्य वजीर झाला होता. परंतु त्याचे आणि यार महमद- खानाचें पुढे कित्येक कारणांवरून वैमनस्य आलें. त्यापैकीं एक कारण असें होतें कीं, त्याने म्हणजे यार महमदखानानें रणजितसिंगाबरोबर स्नेहभावानें वागण्याचा करार केला होता. ह्या वैमनस्याचा परिणाम महमद अझीमखानानें असा केला कीं, तो काबूल येथून आपल्या बरोबर बरेंच सैन्य घेऊन पेशावरास आला, आणि तेथें 'युसफ जाई' लोकांस " जिहाद करून त्यांस त्यानें आपल्याबरोबर घेतले. नंतर त्यानें तेथून सुमारे ७५ कोसांवर असलेल्या 'नवशेरा नामक ठाण्यास येऊन त्या नजीकच 'थेरी ' म्हणून एक खेडेगांव आहे त्या ठिकाणीं रणजितसिंगाचें जें थोडेंसें सैन्य होतें त्याबरोबर लढाई दिली. शीख लष्कराने त्यावेळी मोठ्या शौर्यानें युसफजाई लोकांस रेंटीत रेंटीत काबूल नदीच्या दक्षीण तीरापर्यंत नेलें आणि एक निकराचा हल्ला केला; परंतु त्या हल्यांत रणजितसिंगाकडील 'फुलासिंग' ह्या नांवाचा एक शूर सरदार पडल्यामुळे शीख सैन्याने कच  *धर्मयुद्धाकरितां उपदेश करणे ह्यास मुसलमानी धर्माचे लोक " जिहाद' म्हणतात.