पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. आमच्या लोकांत विद्येची अभिरुचि लागून ऐतिहासिक ज्ञानाचा प्रसार जितका व्हावयास पाहिजे तितका झाला नसल्याने जगांत जीं रानटी स्थितीत राष्ट्रे आहेत त्यांपैकींच आमचा हिंदुस्तान देश अद्यापि आहे असें ह्मटल्यास अन्यथा होणार नाहीं. सांप्रत आम्हांस पाश्चात्त्य विद्यादानाचा लाभ आमच्या दयाळू सरकाराकडून मिळत आहे खरा, व तेवढ्या वरून आम्ही फुगून जाऊन मध्येंच उडी मारण्याचा यत्न करितों, परंतु ती आमची उडी कुंपणावरील सरड्याच्या उडीप्रमाणे आहे किंवा काय याचा मात्र विचार आमच्या मनांत येत नाहीं. याकरितां अशा प्रकारचें ज्ञान आम्ही नुसत्या घोकंपट्टीने मिळविण्याच्या नादीं न लागतां तें प्राचीन व आर्वाचीन इतिहासज्ञांनी केलेले ग्रंथ वाचून व त्यांचे चांगले परिशीलन करून मिळविलें पाहिजे. इतकेच नाहीं तर आमच्यांतील आधुनिक विद्वानांच्या लेखणींतून या विषयावर अनेक लेख व ग्रंथ समूहही तयार झाला पाहिजे. हा ग्रंथसमूह अमुकच प्रमाणावर असावा असें नाहीं. लहान लहान ग्रंथ जरी असले तरी त्यांची ऐतिहासिक ज्ञान भांडारांत थोडीबहूत भर पडल्यावांचून राहणार नाहीं असे खास वाटतें. अस्तु. वरील हेतु मनांत आणून भी हा चरित्ररूपी अल्पसा लेख लिहिण्याचे काम हातीं हें चरित्र म्हणजे, हिंदुस्ता नच्या उत्तरेकडील भागांत रणजितसिंग नांवाचा एक रजपूत शीख एकोणिसाव्या शतकास प्रारंभ होऊन कांहीं