पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३५ )


खाऊन माघार घेतली; तथापि त्याच नदीच्या उत्तरेकडील बाजूवर शीख सरदार ' हरीसिंग नलवा ' आणि त्याच्या हाताखालील जनरल व्हेंवरा ' जमादार खुशाल- सिंग, ' व सरदार 'बुधसिंग सिंघन्वाला' ह्या सर्वांनीं आपलें लष्कर एकत्र करून काबुली लोकांस चोहोकडून घेरून टाकिलें; तेणेंकरून महमद अझीमखान अगदीं मांबावल्यासारखा होऊन त्यास कांहीं सुचेनार्से झाल्यामुळे त्यास पेशावर सोडून देऊन पळून जाणे भाग पडलें.
 तदनंतर रणजितसिंगास दुसरा एक नवीन शत्रू उत्पन्न झाला. तो वायव्येकडील प्रांतांत ' नसिराबाद येथील राहणारा असून त्याचें नांव सय्यद अहमदशहा असें होतें. हा सय्यद धर्मवेडाने धुंद होऊन शीख लोकांचा उघड द्वेष करूं लागला होता. ह्यावेळीं त्यानें कंपनी सरकारासही बराच त्रास दिला असल्यामुळे तें सरकार त्याचा बंदोबस्त करीत असतां तो पेशावरानजीकच्या डोंगरांत जाऊन तेथील रानटी लोकांस त्यानें आपले सहानुयायी बनविलें. हिंदुस्तानांत वाहबी' म्हणून जो एक पंथ आहे त्याची स्थापना ह्याच सय्यदाने केली असे म्हणतात. इ. स. १८२४ त रणमित्- सिंगानें सरदार हरीसिंग नलवा ह्यास हजाराप्रांत घेण्याकरितां पाठवून तेथील ' बरकझाई ' वगैरे लोकांस जिंकून तो प्रांत काबीज केला व त्याची व्यवस्था लाविण्याचें काम्ही त्यानें त्याच शूर सरदाराकडे सोपविलें. हरीसिंगाने तेथील रहिवाशी मुसलमान लोकांस फार कडक रीतीनें वागविल्यामुळे त्यांनी " द्रबंद ' अथवा दरबंद येथे एक मोठें बंड उपस्थित करून
 रणजित्सिंगाच्या पदरीं त्या वेळी जनरल बेहकुरा प्रमाणे आणखी दुख ही परद्वीपस्थ सरदार होते. या सर्वांची हकीकत पुढील भागांत येईल.