पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३६ )

हरीसिंगास ते जुमानीनातसे झाले. हे वर्तमान रणजितसिंगास अमृतसर येथें कळतांच त्यानें बुधसिंग सिंघनवाला ह्यास त्याच्या मदतीस पाठविलें. नंतर त्या उभयतांनी सय्यद अहमदशहाच्या सुमारे १० हजार रानटी लोकांचा पूर्ण पराजय करून त्या 'धर्मवेड्या सग्यदास ' अकोरा' येथें हांकून लाविलें. परंतु इतके झाले तरी तो स्वस्थ न बसतां त्यानें शीख सरदार बुधसिंग 'जगीरा' येथें आल्यावर त्यास पुन्हां गांउलें. त्या- समय बुधसिंगास दोगरा राजे व अतारी सरदार येऊन मिळाले होते. तेव्हां त्या सर्वांचे मिळून १० हजारांवर सैन्य असून १२ तोफाही होत्या. ह्यावेळीं सदरहू सय्यदा जवळही • काबुली, युसफजाई व अफगाण पठाण वगैरे शूर लोकांचा बराच भरणा होता तरी त्यांचा शीख लोकांनी पराभव करून त्यांस हांकून लाविलें. ह्याचवेळी ह्या लढाईत सय्यदास पेशावर येथील यारमहमदखानानें अंतस्थ मदत केली होती असा संशय आल्यावरून त्याचें पारिपत्य करण्या करितां स्वतः रणजिंत्सिंग आपली खास फौज घेऊन अमृतसर येथून निवाला, आणि ' वाला हिस्सार ' येथील राजवाडा जाळून त्याने तेथील मशीदही भ्रष्ट करून टाकिली. हें वर्त्त- मान यारमहमदखानास समजतांच तो पेशावराहून निघून बालाहिस्सार येथें रणजितसिंगाच्या भेटीस आला,आणि मेटीअंती जे कांहीं नजरचुकीनें आपले कडून घडून आर्ले असेल त्याची माफी मागून त्यानें पूर्वी रणजितसिंगास जी खंडणी देण्याचे कबूल केलें होतें तिजपेक्षां आणखी जास्त देण्याचे कबूल करून आपल्या मुलासही रणजितसिंगाबरोबर् अमृतसर येथें ओलीस म्हणून पाठवून दिलें. सारांश, ह्या- प्रमाणें रणजितसिंगाचा विजयध्वज सर्व पंजाबांतच नव्हे तर